बारा जागांसाठी १९० इच्छुकांचे अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पक्षाकडून एबी फॉर्म मिळण्यास झालेला उशीर.. त्यामुळे इच्छुकांची वाढत असलेली धाकधूक..... शक्तिप्रदर्शन करीत आलेले उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते... त्यांना आवरण्यात पोलिस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची झालेली दमछाक, असे चित्र भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तीन प्रभागांतील १२ जागांसाठी जवळपास १९० इच्छुकांनी अर्ज दाखल केले.

महापालिका निवडणुकीत अनेक पक्षांकडून अधिकृत उमेदवार कोण? हे निश्‍चित होत नसल्याने सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यामुळे सकाळी अकरापासून कार्यालयाच्या आवारात गर्दी उसळली होती.

या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रभाग क्रमांक १८, १९ आणि २० मधील इच्छुकांचे अर्ज भरण्याची व्यवस्था येथे केली होती. पेठांचा परिसर आणि गल्लीबोळ असल्याने कार्यालयाच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक दिग्गज इच्छुक येऊन कार्यालयाच्या परिसरात थांबले होते.

दुपारी दोन वाजेपर्यंत पक्षांकडून नक्की कोणाला उमेदवारी निश्‍चित झाली आहे, याची खात्री होत नसल्यामुळे ऐनवेळी धावपळ नको, म्हणून अनेकांनी अर्ज भरून एबी फॉर्मची वाट पाहत बसणे पसंत केले. जसजशी उमेदवारी निश्‍चित होत होती, तसतसे त्यांचे कार्यकर्ते एबी फॉर्म घेऊन कार्यालयात पोचविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र होते. या धावपळीत कागदपत्रांत चुका झाल्याने अनेक इच्छुकांची धावपळ उडाली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते.

Web Title: Twelve candidates filed nominations for seats190