सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पिंपरी : घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत. सव्वा दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. 

पिंपरी : घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत. सव्वा दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. 

नारायण जालिंदर कानडे (वय 21, रा. बावधन), रोहित शिंदे, प्रसाद शिंदे अशी अटक आरोपींची नावे आहेत. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या कानडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार प्रसाद शिंदे, निखिल थोरात, रोहित शिंदे, किरण बोत्रे, इम्रान सय्यद व एक महिला यांनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार कानडे याच्यासह रोहित शिंदे व प्रसाद शिंदे यांना अटक केली.

या चोरट्यांकडून लॅपटॉप, पॉवर बँक, 204 किलो पॉलिकॅब वायर, तांब्याचे 26 नळ, एक टॅब, दोन कॅमेरा, एक तिजोरी, एक टिव्ही असा एकूण दोन लाख 52 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. या कारवाईत हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या बारा गुन्ह्यांची उकल झाली. या आरोपींवर सिंहगड, पौड, चंदननगर, भारती विद्यापीठ, लोणीकंद या पोलिस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve crimes of burglary revealed by criminals in pimpari