सोशल मीडियाद्वारे २८ लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे - सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून महिलेसह चौघांनी एका नागरिकाला बियाणांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने २८ लाख २२ हजार रुपयांना गंडा घातला. 

याप्रकरणी कर्वेनगर येथील ४७ वर्षीय नागरिकाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ मे २०१७ ते १६ जून २०१७ या कालावधीत घडला. 

विकी मोर नावाच्या महिलेशी फिर्यादीची सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. तिने ‘जी फार्म’ कंपनीत कार्यरत असल्याचे सांगितले. ही कंपनी चेन्नई येथील एका एजंटामार्फत बियाणे खरेदी करते. मात्र, संबंधित एजंटाचा मृत्यू झाल्यामुळे विजय देसाई नावाचे बियाणे उत्पादक कंपनीशी व्यवहार करू शकत नसल्याचे तिने फिर्यादीला सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीला मध्यस्थ करून गुंतवणूक केल्यास निव्वळ नफ्यात समान हिस्सा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार तिने देसाई, टोनी रिचर्ड हा कंपनीचा संचालक व फ्रॅंक हा बियाणे निरीक्षक असल्याचे भासविले. त्यानंतर वेळोवेळी फोन करून फिर्यादीला बॅंक खात्यामध्ये २८ लाख २२ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही, अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे करत आहेत.

Web Title: twenty eight lakh frauds through social media