आळंदी : पिसाटलेल्या कुत्र्यामुळे साडेतीन वर्षाच्या मुलाला करावी लागणार प्लास्टिक सर्जरी

Twenty five people injured due to Pounded dog in Alandi
Twenty five people injured due to Pounded dog in Alandi

आळंदी : पिसाळलेले कुत्र्याच्या चाव्याने अवघ्या तासाभरात पंचवीस जखमी झाले. गालाचा चावा घेतल्याने माउली इंगळे हा साडेतीन वर्षाचा लहान मुलगा गंभीर जखमी असून ससून रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान स्थानिक युवकांनी रात्री कुत्र्याला मारून टाकल्याने शहरवासियांची पिसाळलेल्या कुत्र्यापासून सुटका झाली.

ही घटना गुरूवारी रात्री साडेसात ते साडेआठच्या दरम्यान गावठाणात घडली. सुरवातीला कुत्र्याने माउली मंदिरात दर्शनासाठी आलेल्या घुंडरे गल्लीतील माउली इंगळे या साडेतीन वर्षाच्या मुलाच्या गालाचा चावा घेतला. गालाचे कातडे बाहेर आले होते. तर त्याला वाचविण्यासाठी भोसरीतून दर्शनाला आलेल्या एका माणसाने कुत्र्याला हटकले. त्यांच्याही हाताला कुत्र्याने चावा घेतला. दरम्यान इंगळे या मुलाला सुरवातीला पिंपरीतील वायसीएम रूग्णालायत नेले. मात्र तेथे दाखल करून न घेतल्याने ससून रूग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केले आणि आता गालाची प्लास्टिक सर्जरी करायला लागणार आहे. एवढा गंभीर चावा इंगळे याचा घेतला.

त्यानंतर चावडी चौकतील चिताळकर यांच्या लहान मुलाच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला. पुढे जावून मरकळ रस्त्यावर एकाला हाताला चावा घेतला. भागिरथी नाल्यावरून येणाऱ्या एका माणसाचा हात कुत्र्याने धरला. पुढे जावून भैरवनाथ चौकातून जाणाऱ्या महाविद्यालयीने विद्यार्थ्यांच्या अंगावर झेप घेत त्यालाही चावला. अशा तऱ्हेने पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील पंचवीस जणांना जखमी केले. कुत्र्याने रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातल्याने रस्त्यावरून फिरताना नागरिक भयभीत झाले होते. दरम्यान जखमींपैकी बहूतांश जणांना पिंपरीतील वायसीएम आणि डिवाय पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अखेर स्थानिक तरूणांनी भैरवनाथ चौकात आले. 

अखेर स्थानिक तरूणांनी भैरवनाथ चौकात आल्यावर कुत्र्याला मारून टाकले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान कुत्र्याच्या चाव्याने जखमी झालेले स्थानिक आळंदीतील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी गेले असता त्याठिकाणी अनुभव चांगला नसल्याचे आरीफ शेख आणि अशोक ठाकर यांनी सांगितले. रूग्णांशी निट न बोलणे, आमच्याकडे लसच नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी लोकांना रूग्णालयात नेले. वायसीएम रूग्णालयातही अनुभव चांगला नसल्याचे शेख आणि ठाकर यांनी सांगितले.

दरम्यान आळंदीतील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. गोरे यांच्या माहिती घेतली असता कुत्र्याच्या चाव्याने त्रस्त रूग्ण रात्री आले. मात्र रात्रीच्या वेळी एक डॉक्टर आणि दोन कर्मचारी होते. रेबिज लस नसल्याने सर्वांना रूग्णवाहिकेतून पिंपरीत हलविले. मागील महिन्यात पाचशे रेबिज लस होत्या. मात्र रूग्णांची संख्या आणि आळंदीसह इतर गावांतून रूग्ण येत असल्याने सध्या रेबिजची टंचाई आहे.

रात्री साडे आठच्या दरम्यान पिसाळलेले कुत्रे मारले. मात्र आज सकाळी अकरा वाजले तरी कुत्र्याचा मृतदेह पालिकेने उचलला नव्हता. पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही. एवढी उदासिनता पालिकेकडून होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आरीफ शेख यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com