उजनी धरणात २१ किलोचा कटला मासा सापडला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

उजनी धरणात २१ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. इंदापूर बाजार समितीच्या मासळी बाजारात प्रतिकिलो २८० रुपयांप्रमाणे ५ हजार ८८० रुपयाला त्याची विक्री झाली. 

इंदापूर - उजनी धरणात २१ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. इंदापूर बाजार समितीच्या मासळी बाजारात प्रतिकिलो २८० रुपयांप्रमाणे ५ हजार ८८० रुपयाला त्याची विक्री झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर बाजार समितीच्या मासळी बाजारातील दत्तात्रेय व्यवहारे यांच्या तेजश्री फिश मार्केट या अडतीच्या दुकानावर बुधवारी (ता. २९) हा मासा विक्रीसाठी आला होता. गलांडवाडी नं.२ येथील प्रमोद नलवडे, रघुनाथ नलवडे यांनी तो मासा विकत घेतला, अशी माहिती तेजश्री फिश मार्केटचे सुनील जाधव  यांनी दिली.

उजनी धरणात गेल्या दोन महिन्यांपासून थंडीमुळे मासे खोल पाण्यात जात असल्याने ते जाळ्यात सापडत नाहीत. त्यामुळे माशांची आवक कमी झाली आहे. मुबलक प्रमाणात चिलापी मासा सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मोठ्या आकाराचा कटला मासा सापडणे, ही मच्छीमारांसाठी पर्वणी असल्याचे मत बंटी राऊत यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty one kg of katla fish was found in Ujani dam