माऊलींच्या पादुकांसोबत 'हे' वीसजण पंढरीला जाणार...

विलास काटे
सोमवार, 29 जून 2020

आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३०) आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या चल पादुकां पंढरीकडे मार्गस्थ होताना सोबत वीस लोकांची यादी आळंदी देवस्थानने तयार केली. दिंडीवाल्यांसोबत एक पुजारी, एक चोपदार, मानक-यांना नेले जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी दिली. 

आळंदी (पुणे) : आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३०) आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या चल पादुकां पंढरीकडे मार्गस्थ होताना सोबत वीस लोकांची यादी आळंदी देवस्थानने तयार केली. दिंडीवाल्यांसोबत एक पुजारी, एक चोपदार, मानक-यांना नेले जाणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पंढरपूरला जाण्यासाठी माऊलींच्या पादुकांसोबत स्वतंत्र पोलिस बंदोबस्त असणार आहे. एसटी बसने पादुका नेताना बसमधे जास्तीत जास्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत नेण्याची परवानगी दिली आहे. पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त अॅड विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळ सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक १ मधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिंडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनचे श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनचे भानुदास टेंभूकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक कर्णेकरी, एक शिपाई अशा वीस लोकांसोबत माऊलींचा सोहळा एसटीने जाणार आहे. 

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

दरम्यान, आषाढ शुध्द दशमीला (ता. ३०)सकाळी माऊलींच्या पादुकांवर पवमान पूजा झाल्यानंतर दुपारी बारा ते साडे बारा नैवद्य दाखविला जाईल. त्यानंतर ठिक एक वाजता माऊलींच्या पादुका पंढरीकडे मार्गस्थ करण्यासाठीची तयारी सुरू होईल. एसटीचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे. वारीसाठी नेल्या जाणा-या वीस वारक-यांना बसमधे प्रवेश देताना कोरोना टेस्ट केली. प्रवासा आधी वारक-यांना फेसशिल्ड, मास्क दिले जाणार आहे. आजोळघरातील पादुका ठिक एक वाजता पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील. सोबत उर्जितसिंह शितोळे सरकार आणि पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई पादुकांसोबत असतील. वाखरीत गेल्यानंतर क्रमवारीनुसार संतांच्या पादुका पंढरीत प्रवेश करतील. 

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

पोर्णिमेपर्यंत सोहळा राहील यासाठी शासनाला विनंती केली असल्याचे ढगे यांनी सांगितले. माऊलींच्या पादुका पंढरीत पोहचवून पुन्हा माघारी आळंदीला आणण्याची जबाबदारी प्रांताधिकारी संजय तेली यांच्यावर सोपवली आहे. 

बंदोबस्त असा राहिल...
आळंदीतील मााऊलींच्या समाधी मंदिराचे सर्व दरवाजे बंद राहतील. तसेच देऊळवाडा, आजोळघर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहिल. देऊळवाडा आणि आजोळघराकडे येण्यास मज्जाव राहिल. तर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty people will go to Pandharpur with Mauli's paduka