शेळ्यांसाठी वीस हजार रुपयांचे अनुदान

सुदाम बिडकर
रविवार, 2 डिसेंबर 2018

पारगाव, (पुणे)  : पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील 11 कुटुंबाना जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने शेळ्या घेण्यासाठी प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान मिळाले असुन या शेळ्यांचे वाटप खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातुन पल्लवी विनायक हारके,सोनल संतोष टाकळकर, मनिषा तुकाराम टाकळकर, छाया मिरा जांभळे, शरद हरीभाऊ मखर, नानाभाऊ दशरथ मखर, सुनिता राजेंद्र वाळुंज, छाया दिपक पोखरकर, जयश्री युवराज टाकळकर, विध्या प्रदिप पाचारणे, हिराबाई ज्ञानेश्वर गोसावी या महीलांना प्रत्येकी दोन शेऴ्या व एक बोकड घेण्यासाठी हे अनुदान देण्यात आले आहे.याप्रसंगी सरपंच जयसिंग पोंदे, निलेश पडवळ, भाऊसाहेब पोंदे, अमीत दौंड, पप्पु दौंड, संदिप पोखरकर उपस्थित होते.  

Web Title: Twenty thousand grants for the goats from Pune Zilla Parishad for women