महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुन्हा 'तिच' चूक करणार का ?

mpsc.jpg
mpsc.jpg

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी लागलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालांमध्ये अनेक उमेदवारांची पुन्हा त्याच पदी निवड झाली होती. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. येत्या काही दिवसात महाराष्ट्र वनसेवा गट क्रमांक प्रथम, द्वितीय श्रेणीच्या पदासाठी मुलाखती होणार आहेत. मुलाखत देणारे 50 हून अधिक उमेदवार हे राज्यसेवेच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण असलेले द्वितीय श्रेणीच्या पदावरती काम करत आहेत. त्यामुळे उमेदवारांना आयोगाने पदांना प्राधान्यक्रम देण्यासाठी पर्याय द्यावा अशी मागणी वन सेवेच्या मुलाखतीला निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.


वन सेवेच्या मुलाखतीसाठी पात्र असणारे विद्यार्थी गजानन चव्हाण सकाळशी बोलताना म्हणाले,   राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एकाच पदावर दोन वेळा निवड झाल्याने बरेच वाद निर्माण झाले होते व विनाकारण नवीन विद्यार्थ्यावर याचा परिणाम होतो व त्यामुळे त्यांची संधी  जाते. कित्येक वर्ष मुल अभ्यास करीत असतात कधीतरी संधी येते आणि मग अशा मार्गाने जर ती जात असेल त्याचा उपयोग नाही. त्यामुळे आयोगाने यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना पदासाठी  प्राधान्य देण्यासाठी पर्याय ठेवले पाहिजे अशी कळकळीची विनंती आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत वन सेवेच्या पदासाठी मुलाखतीसाठी निवड झालेले जगदीश दळवी म्हणाले, गेली पाच वर्षे अभ्यास करतोय मुलाखतीला कधीतरी संधी मिळते आणि आणखी अंतिम निकालात नाव येणे म्हणजे आणखी कठीण अशी परिस्थिती असताना निवड झालेल्यांमध्ये द्वितीय श्रेणीत कार्यरत असलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांची जर निवड झाली तर आता अभ्यास करुन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर हा मोठा अन्याय ठरेल त्यामुळे आयोगाने यामध्ये लक्ष घालावे.

५ जुलै २०२० रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र वनसेवेच्या मुलाखत कार्यक्रम जाहीर केला आहे. 
सदर यादीमध्ये राज्यसेवा परीक्षेतून गट ब या पदावर निवड झालेले बरेच उमेदवार आहेत. सदर उमेदवारांनी वनसेवा परीक्षेसाठी गट अ आणि गट ब अशा दोन्ही पदांचे पसंतीक्रम दिले आहेत. पण आता त्यांची इच्छा आहे की त्यांचा फक्त वनसेवेतील गट अ पदाकरिता विचार व्हावा. यामुळे वनसेवा परिक्षेची पसंतीक्रम देण्याची लिंक पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून उमेदवार आपले पसंतीक्रम बदलू शकतील. यामुळे एकाच उमेदवाराची दोन पदांवर निवड होऊ शकणार नाही आणि अन्य उमेदवारांवरती अन्याय होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com