जुळ्या बहिणींना दहावीत समान गुण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

आंबेठाण - आंबेठाण (ता. खेड) येथील प्रदीपकाका कुलकर्णी यांच्या सानिका आणि सेजल या दोन जुळ्या कन्या. 

दोघी वाकी खुर्द येथील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेतात. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात दोघींना सारखेच म्हणजे ५०० पैकी ३८७ गुण मिळाले आहेत. याशिवाय कला किंवा खेळाचे मिळणारे गुण देखील  सारखेच मिळाले आहेत. त्यांच्या गुणांची टक्केवारी ही ७८ टक्के इतकी आहे. 

दोघींची चित्रकला आणि रांगोळीची आवड सारखीच आहे. या दोघींना कराटेची आवड असून तायक्वांदोमध्ये दोघींनी पदक जिंकले आहे. यात एकीला सुवर्ण तर दुसरीला रौप्यपदक मिळाले आहे. दोघींना अन्य खेळात देखील समान आवड आहे. त्यांच्या या अनोख्या यशाबद्दल त्यांचे शिक्षक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Twin sisters same mark in SSC exam