निर्दयी! पुण्यात एक दिवसांच्या जुळ्यांना ऐन थंडीत फेकून दिले तलावाशेजारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

आज सकाळी पाषाण तलावाजवळ साडे आठच्या दरम्यान फिरायला येणाऱ्या नागरीकांना मुलगा व मुलगी अशी जुळी अर्भके आढळून आली आहेत. नागरिकांना ताताडीने चतु:शृंगी पोलिसांना माहिती दिली.

पुणे : पाषाण तलावाजवळ एका दिवसाचे जिवंत जुळे अर्भके आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या बाळांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज सकाळी पाषाण तलावाजवळ साडे आठच्या दरम्यान फिरायला येणाऱ्या नागरीकांना मुलगा व मुलगी अशी जुळी अर्भके आढळून आली आहेत. ऐन थंडीत या जुळ्यांना तलावाशेजारी ठेवले होते. नागरिकांनी ताताडीने चतु:शृंगी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले.

'भोवतालच्या वेदना समजण्याची गरज'Image may contain: one or more people, people sleeping, baby and closeup

पोलिसांनी या अर्भकांना ससून रुग्णालयात हलवले आहे. ही अर्भके या ठिकाणी कोणी सोडून दिली याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Image result for /pune-twins-found-near-pashan-lake


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twins found near pashan Lake in Pune