‘मोका’तील आरोपीसह दोघांना शस्त्रांसह अटक

Crime
Crime

पुणे - महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोका) गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांस घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मंगळवार पेठेतील कडबाकुट्टी परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

ओंकार दिलीप फडतरे (वय २३, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पिंपळे गुरव), जलालुद्दीन निजामुद्दीन शेख (वय १९, रा. सद्‌गुरू कॉलनी, वाकड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे एक कोयता, चॉपर व चाकू अशी घातक शस्त्रे आढळली. दरम्यान, फडतरे व शेख या दोघांसमवेत असलेला त्यांचा तिसरा साथीदार रूपेश गायकवाड हा पोलिसांच्या हातातून निसटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com