ओंकार कुडलेच्या खूनाचा प्रयत्न प्रकरण: बंडू आंदेकरसह दोघांना अटक

Two arrested in Bandar Andekar case of attempted murder of Omkar Kudle
Two arrested in Bandar Andekar case of attempted murder of Omkar Kudle

पुणे : कुडले टोळीचा ओंकार कुडले याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. वर्चस्व लढाईतून आंदेकर टोळीने २१ फेब्रुवारीला गणेश पेठेतील बांबू आळीमध्ये ओंकारवर घातक शस्त्राने वार करण्यात आले होते. सूर्यकांत ऊर्फ बंडू राणेजी आंदेकर आणि ऋषभ देवदत्त आंदेकर अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अशोक वड्ड, स्वराज वाडेकर, आदित्य उकरंडे आणि गाडी गण्या यांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ, बांबू आळी) याने खडक त्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात फिर्याद दिली होती. ओंकार आणि आंदेकर टोळी यांच्यात अनेकदा वादावादी झाली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आंदेकर टोळीचे सक्रीय आहे. कुडले याच्यामुळे आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याचे बंडू आंदेकर याला वाटत होते. त्यातूनच त्याच्या सांगण्यावरून ऋषभ आंदेकर, सूरज ऊर्फ गणेश, गाडी गण्या यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ओंकार याच्यावर पालघन, कोयता अशा धारदार हत्याराने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर व खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बहिरट यांच्या पथकाने बंडू आंदेकर आणि ऋषभला घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गाडे करीत आहेत.

जेईई मेन्स दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात 
आंदेकरकर विविध गुन्हे दाखल :
बंडू आंदेकर याच्यावर १९८५ पासून खून, खुनाचा प्रयत्न, धमक्‍या देणे, शस्त्रे बाळगणे अपहरण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फरासखाना, खडक व समर्थ पोलिस ठाण्यात दाखल आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com