पुणे : हरणाच्या कातडीचे खरेदी-विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या दोघांना अटक

पुणे : हरणाच्या कातडीचे खरेदी-विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या दोघांना अटक

पुणे : काळवीटच्या कातडीचे खरेदी-विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या दोघांना वन्यजीवरक्षक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून हरणांची तीन कातडी जप्त करण्यात आली आहेत.

दीपक सुभाष कुलकर्णी (वय 40, रा. श्रीशैल्य बंगला, आनंदनगर) आणि गणेश लहू पवार (वय 32, रा. मालेगावकर वसतिगृह, सोमवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कात्रज जुन्या बोगद्याजवळून दोघांना गुरुवारी (ता. 14) संध्याकाळी साडेपाच वाजता अटक करण्यात आली.

कात्रजचे वनरक्षक एस. एस. खेडकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि भारतीय वन अधिनियम 1927 च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रज जुन्या बोगद्याजवळ आरोपींच्या कारची तपासणी केली असता त्यात एका काळवीटाची कातडी आढळून आली. दीपक याच्या घराची तपासणी केली असता त्यात देखील दोन हरणांची कातडी सापडली. वन्यजीवरक्षक पोलिसांनी ही कातडी जप्त केली असून, शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी कातडी कोठून आणली? कातडी खरेदी-विक्रीच्या रॅकेटची उकल करण्यासाठी आणि आरोपीसह मृत प्राण्याचा घटनास्थळाची पाहणी करायची असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती.

त्यांचा युक्तिवाद मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. जोंधळे यांनी आरोपींना 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक वन्यजीवरक्षक एम. जे. सणस करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com