पुणे : मौजमजेसाठी लुटीचा बनाव करणारे दोघे अटकेत

सकाळ वृ्त्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

कर्ज फेडण्यासह मौजमजेसाठी पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून 34 लाख 39 हजार 463 रुपयांची रोकड जप्त केली. 
 

पिंपरी : कर्ज फेडण्यासह मौजमजेसाठी पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरीचा बनाव करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. आरोपींकडून 34 लाख 39 हजार 463 रुपयांची रोकड जप्त केली. 

कुणाल रवींद्र पवार (वय 20) व ओंकार ऊर्फ मोन्या बाळासाहेब भोगाडे (वय 21, रा. हनुमान कॉलनी, हुतात्मा चौक, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कुणाल पवार हा कॅश जमा करणाऱ्या एका कंपनीत काम करतो. बुधवारी (ता. 14) पवार कॅश जमा करून ताथवडे येथे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एकाने पिस्तुलाचा धाक दाखवला. त्याच्याकडील 33 लाख 30 हजार 464 रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत देहूरोड ठाण्यात गुन्हा दाखल होता.

गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक व देहूरोड पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत होते. दरम्यान, युनिट पाचच्या पथकाने फिर्यादीकडे चौकशी केली असता त्याच्या बोलण्यामध्ये तफावत आढळली. त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने आठ दिवसांपासून कट रचून भोगाडे याच्यासह रोकड लुटीचा बनाव केल्याचे कबूल केले. त्यानंतर भोगाडे याला भोसरीतून ताब्यात घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two arrested for fake robbary in pune