जमिनीच्या वादातून वकीलावर गोळीबार; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

पुणे : वकील ढेकणे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथून अटक केली. कुरुमदास कालूराम बढे (वय 33, रा. कालूस, पवलेवाडी, ता. खेड) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर एकजण अल्पवयीन आहे.  आरोपींच्या ताब्यातून पिस्तुल आणि मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान वकील ढेकणे यांच्यावर झालेल्या गोळीबारा निषेधार्थ पुणे शहरातील वकीलांचे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्या वकीलांनी कामकाज करणाऱ्या वकीलांना काम थांबविण्यास सांगितले होते. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक वकीलांनी घोषणा दिल्या.  

पुणे : वकील ढेकणे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथून अटक केली. कुरुमदास कालूराम बढे (वय 33, रा. कालूस, पवलेवाडी, ता. खेड) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर एकजण अल्पवयीन आहे.  आरोपींच्या ताब्यातून पिस्तुल आणि मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून वकीलांवर गोळीबार झाल्याचे तपसात समोर आले. 

दरम्यान वकील ढेकणे यांच्यावर झालेल्या गोळीबारा निषेधार्थ पुणे शहरातील वकीलांचे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनकर्त्या वकीलांनी कामकाज करणाऱ्या वकीलांना काम थांबविण्यास सांगितले होते. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह अनेक वकीलांनी घोषणा दिल्या.  

बढ़े आणि त्याच्या चुलत्याचे जमीनीवरुन वाद चालू होते. त्याविषयी ढेकणे यांच्याकडे बढे याने प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी वकील ढेकणे यांनी शुल्क म्हणून 2 लाख मागितले. मात्र आरोपीकडे पैसे नसल्याने त्याने त्याची 20 गुंठे जमीन ढ़ेकणे यांच्या भावाच्या नावावर केली होती. तसेच 2 लाख रूपयांचा चेक दिला होता. मात्र जमीनीच्या वादाचे प्रकरण न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच मिटले. त्यानंतर आरोपीने वकिल ढेकणे याच्याकडे दोन लाख रूपये मागितले. 4 वर्ष पैसे मागुनही ते दिले नाहीत. त्यामुळे अखेर आरोपीने मेरठ येथून पिस्तूल आणून वकिल ढेकणे यांच्यावर गोळीबार केला.

सोमवारी (ता.22) रात्री साडेआठ वाजता कारमधून जात असलेल्या अॅड. देवानंद ढेकणे (रा. येरवडा) यांच्यावर संगमवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी पिस्तुलातून गोळीबार केला. यात ढोकणे यांच्या डोक्‍याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. अॅड. ढेकणे यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर तेथून पसार झाले. दरम्यान, ढेकणे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: two arrested Firing on lawyers from land disputes