पिंपरीमध्ये 'ते' घरातच छापायचे दोन हजारांच्या नोटा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

-दोन जण निगडीत जेरबंद.

-तीन लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : घरातच बनावट नोटांचा छापखाना सुरू करून चलनातील दोन हजाराच्या नोटा छापणाऱ्या दोन जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोघांकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निगडीतील घरकुल येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

लॉकडाउनच्या कालावधीत आरोपींनी घरातच बनावट नोटा प्रिंट करणे सुरू केले. दोन हजारांच्या नोटांची छपाई त्यांनी केली. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर त्यांनी या नोटा व्यवहारात आणल्या. दरम्यान,  चिखलीतील घरकुल परिसरात दोन तरुणांनी घरात नोटा छापल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी या घरावर छापा टाकून दोन्ही तरुणांना जेरबंद केले. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

दोघांकडून तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे प्रिंटर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या तरुणांकडे कसून चौकशी केली असता या दोघांना पुण्यातील एका मित्राने मदत केली. तसेच मुंबईतील एक व्यक्तीही त्यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested for printing notes at home

Tags
टॉपिकस
Topic Tags: