esakal | वृत्तपत्र विक्रेत्यास तलवारीचा धाक दाखवुन लुटणाऱ्या दोघांना अटक

बोलून बातमी शोधा

Two arrested for robbing newspaper vendor by threatening with sword}

गौरव ऊर्फ लाल्या सुहास फडणीस (वय 30, रा. पर्वती दर्शन), अक्षय उर्फ पप्पू कैलास गरूड (वय 22, रा. व्हिआयटी कॉलेजसमोर, अप्पर इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेत वृत्तपत्र विक्रेते शंकर खुटवड जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटवड हे गुरूवारी पहाटेच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील लक्ष्मीणारायण चित्रपटगृहाजवळील पुलाखाली बसले होते.

pune
वृत्तपत्र विक्रेत्यास तलवारीचा धाक दाखवुन लुटणाऱ्या दोघांना अटक
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पहाटेच्यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यास तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील 90 हजारांची रोकड जबरदस्तीने लुटून नेणाऱ्या दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी पैशांच्या चणचणीतून हा प्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

गौरव ऊर्फ लाल्या सुहास फडणीस (वय 30, रा. पर्वती दर्शन), अक्षय उर्फ पप्पू कैलास गरूड (वय 22, रा. व्हिआयटी कॉलेजसमोर, अप्पर इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेत वृत्तपत्र विक्रेते शंकर खुटवड जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटवड हे गुरूवारी पहाटेच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील लक्ष्मीणारायण चित्रपटगृहाजवळील पुलाखाली बसले होते. त्यांच्याकडे वृत्तपत्र विक्रीतुन जमा झालेली 90 हजार 300 रुपयांची रक्कम होती.त्यावेळी तीन आरोपी दुचाकीवरुन त्यांच्या ठिकाणी आले. त्यातील एकाने खुटवड यांची पैसे ठेवलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे पेपर खरेदीसाठी आलेल्या एका ग्राहकाने आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीवर लाथ मारली. त्यामुळे तिघेहीजण खाली पडले. ग्राहकाने खुटवड यांच्या मदतीने एकाला पकडून ठेवले. त्यावेळी तिघांनी खुटवड यांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून पळ काढला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, तेथे पडलेली दुचाकी घेण्यासाठी एक आरोपी तेथे आला. त्यास खुटवड ओळखत होते. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. संबंधीत गुन्ह्यातील आरोपी पर्वती येथील लोखंडी पुलाजवळ येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केली. तर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध याच पद्धतीने पुणे शहर व जिल्ह्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर, विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस हवालदार राजु जाधव, महेश गाढवे,कुंदन शिंदे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.