पुण्यात खवल्या मांजराच्या विक्रीचा प्रयत्न ; दोघांना अटक  

manjar.jpg
manjar.jpg

पुणे : कोल्हापूर भागातून खवल्या मांजर पकडून पुण्यात विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोन तस्करांना गुन्हे शाखेच्या युनीट एकने पकडले. त्यांच्याकडून 50 लाख रूपये किंमतीचे खवल्या मांजर जप्त करण्यात आले. 

रामचंद्र दिनकर गायकवाड (वय 29, रा. पन्हाळा, कोल्हापूर), सुरज धनाजी फाळके (वय 20, रा. कोरेगाव, सातारा) या दोघांना अटक केली आहे. गायकवाड आणि फाळके हे दोघे खवल्या मांजर घेऊन पुण्यात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली. त्यानूसार युनीट एकच्या पथकाने सापळा रचून या दोघांना कात्रज चौकात पकडले. त्यांची झडती घेतली असता पोत्यामधून सुमारे 12 किलो वजनाचे खवल्या मांजर जप्त केले. याप्रकरणी दोघांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक दिनेश पाटील, तुषार माळवदकर, गजानन सोनूने, बशीर सय्यद, सुधाकर माने यांनी ही कारवाई केली. हे खवल्या मांजर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com