Baramati Crime : बारामतीत गावठी बनावटीच्या पिस्तूलासह दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two arrested with Gavathi pistol in Baramati crime police

Baramati Crime : बारामतीत गावठी बनावटीच्या पिस्तूलासह दोघांना अटक

बारामती : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली असून या दोघांना पिस्तूल विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता. 13) बारामती ते भवानीनगर रस्त्यावरील उड्डाणपूलाखालील बाजूस दोन संशयित इसमांकडे पिस्तूल असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होती.

त्या नुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत आकाश उर्फ अक्षय संतोष खोमणे (रा. चिखली, वंजारवस्ती, ता. इंदापूर) व सोमनाथ ज्योतीराम खुरंगे (रा. रोहि पाटील मारुती मंदीराजवऴ, बारामती) यांच्याकडे गावठी बनावटीचे अंदाजे 35 हजार रुपये किंमतीची दोन पिस्तूले व दोन जिवंत काडतूसे सापडली. त्यांना पोलिसांनी अटक केली.

दरम्यान या पिस्तूलाची विक्री त्यांना ऋषीकेश नितीन सावंत (रा. जाचकवस्ती, लासुर्णे ता. इंदापूर) याने केल्याचे सांगितल्यावरुन त्याच्याविरुध्दही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी स्वप्निल मदन अहिवळे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी फौजदार लेंडवे अधिक तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसात बारामतीत गावठी बनावटीची पिस्तूले सापडण्याचे प्रमाण वाढले असून सर्रास आढळणारी ही पिस्तूले कायदा व सुव्यवस्थेसाठी धोक्याचे मानले जात असून पोलिसांनी या बाबत तपास सुरु केला आहे.