Vidhan Sabha 2019 : पुण्यात 'या' दोन उमेदवारांचा निकालाआधीच विजयोत्सव !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

मतमोजणी होण्यापूर्वीच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन दोडके यांनी विजयाचे होर्डिंग्ज लावले आहेत. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतही त्यांनी असेच होर्डिंग्ज लावून आधीच विजयाचा दावा केला होता. त्याचबरोबर, कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे यांनी मतदानाची वेळ संपल्यावर कासेवाडीतील अशोक चौकात फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला आहे.

पुणे : मतमोजणी होण्यापूर्वीच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सचिन दोडके यांनी विजयाचे होर्डिंग्ज लावले आहेत. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतही त्यांनी असेच होर्डिंग्ज लावून आधीच विजयाचा दावा केला होता. त्याचबरोबर, कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील कांबळे यांनी मतदानाची वेळ संपल्यावर कासेवाडीतील अशोक चौकात फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला आहे. मतमोजणीच्या आधीच लागलेले विजयाचे होर्डिंग्ज आणि झालेली आतषबाजी यामुळे वारजे आणि कासेवाडी परिसरात मतदारांची वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

Image may contain: 4 people, people smiling

विधानसभेची मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी (गुरुवारी) सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात 43. 70 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर दोडके यांच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुमारे 50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Image result for sunil kamble esakal

पुणे कँन्टोन्मेंट मतदारसंघात कांबळे यांनी भाजपच्या तिकीटावर तर, खडकवासला मतदारसंघातून दोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे.  कांबळे यांचा सामना काँग्रेसच्या रमेश बागवे यांच्याशी तर दोडके यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर यांच्याशी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two candidate in Pune celebrates win before Vidhan sabha election result