पुणे : घरफोडी करणार्‍या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक

जनार्दन दांडगे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

वाघोली परिसरात घरफोडी करणार्‍या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामिण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाघोली (ता. हवेली) येथून रविवारी (ता. ६) अटक केली आहे.

लोणी काळभोर : वाघोली परिसरात घरफोडी करणार्‍या दोन अट्टल गुन्हेगारांना जिल्हा (ग्रामिण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाघोली (ता. हवेली) येथून रविवारी (ता. ६) अटक केली आहे.

राहुल यमनप्पा गायकवाड (वय २१, रा. गारुडवस्ती लोहगाव, पुणे ), भरत संजय स्वामी (वय १९, रा. संतनगर, ससाणे हडस. लोहगाव, पुणे) ही अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यांच्यावर वारजे, भोसरी, विश्रांतवाडी, अशा दहाहून अधिक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे. तसेच चोरी केलेला माल विकत घेणार्‍या दोघांनाही पकडण्यात आले आहे. विनोद गणेश सिंग (वय ३४, रा.धानोरी गावठाण, पुणे ), उपेंद्र शिवपूजन राम (वय २४, रा. अमनोरा पार्क हडपसर, पुणे ) अशी त्यांची नावे आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two criminals arrested in wagholi