लोहमार्गासाठी 2 कोटी ब्रास माती

सुधीर साबळे
शुक्रवार, 25 मे 2018

पिंपरी - पुणे ते नाशिकदरम्यान प्रस्तावित लोहमार्ग पश्‍चिम घाट परिसरात येत आहे. या घाटात अनेक चढ-उतार असल्यामुळे त्यासाठी सुमारे दोन कोटी ब्रास माती लागणार आहे. या मातीच्या खरेदीपोटी रेल्वे प्रशासनाला तब्बल अठराशे ते दोन हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. त्याबाबतचा पाहणी अहवाल रेल्वे प्रशासनाने नुकताच रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. 

तळेगाव ते नाशिकदरम्यान रेल्वे प्रशासनाकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही. त्यामुळे त्यांना भूसंपादन करावे लागणार आहे. या टप्प्यात २१० किलोमीटर अंतराचा एकेरी लोहमार्ग विकसित केला जाणार आहे. त्यासाठी एक हजार २५० हेक्‍टर जमिनीचे संपादन अपेक्षित आहे. तर या संपादनासाठी जवळपास १२०० ते १५०० कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्‍यता असल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. 

असा आहे मार्ग
 तळेगावपर्यंतचा जुना लोहमार्ग वापरला जाणार. त्यानंतर रेल्वे चाकण, राजगुरुनगर, आळेफाटा, संगमनेर, सिन्नरमार्गे नाशिककडे.
 १५ स्थानके प्रस्तावित.
 १३ किलोमीटर अंतराचे एकूण ११ बोगदे. त्यापैकी सर्वांत मोठा सहा किलोमीटरचा 
 कोठेही रेल्वे फाटक नाही. 
 सहा मोठे पूल प्रस्तावित. त्यांची लांबी पाच किलोमीटरपर्यंत.
 सर्वांत मोठा पूल ८०० मीटर लांबीचा.
 चंदनापुरीच्या घाटामुळे रेल्वे मार्गात एक किलोमीटरने वाढ.

या लोहमार्गासाठी महाराष्ट्राच्या रेल इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

हा लोहमार्ग लवकर झाल्यास प्रवाशांना फायदा होईल. या मार्गावरील गावांची कनेक्‍टिव्हिटी वाढेल.
- दत्तात्रेय चौधरी, प्रवासी

Web Title: two crore brass soil for railway line