पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातात 2 जण ठार, तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

अपघातानंतर द्रुतगतीवर वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक मदत चौकी व खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले.

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूर फूड मॉलजवळ आज सकाळी (सोमवारी) भरधाव ट्रेलर व टेम्पोच्या धडकेत झालेल्या अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर द्रुतगतीवर वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक मदत चौकी व खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले.

जखमींवर पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two dead in accident on Pune-Mumbai express way