स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

पुणे - स्वाइन फ्लूमुळे पुण्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या आजाराने ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी १३ शहरातील आहेत. उर्वरित २८ रुग्ण उपचारासाठी पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते, अशी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

सिंहगड रस्ता परिसरात राहणारी ४० वर्षीय महिला आणि धानोरी येथील ५४ वर्षांच्या पुरुषाचा शनिवारी (ता. २२) मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने कळविली.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू झालेल्या १२ रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तसेच, १७ रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जानेवारीपासून शहरातील २३७ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असला तरीही, त्यापैकी १६७ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारीचे उपाय करावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे केले आहे.

लक्षणे दिसताच औषध द्या
ताप, सर्दी, खोकला, उलट्या अशी लक्षणे दिसताच दोन दिवसांत स्वाइन फ्लूच्या औषधांचा सल्ला रुग्णांना द्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांना महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. त्यातून स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्‍य होईल.

Web Title: two death by swine flu