मोटार अपघातात 2 डॉक्‍टरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

इंदापूर - पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे ५ वाजता चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात विजापूर येथील अल्‌ अमीन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर राकेश. एस. श्रीनिवास (वय २३, रा. बंगळूर), माधव प्रसाद जहागीरदार (वय २२, रा. मुंबई) यांचा मृत्यू झाला, तर एस. मठ (वय २३), सिद्धार्थ मजगी (वय २४) (दोघे रा. विजापूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकलूज येथे उपचार सुरू आहेत. 

गाडीमधून चार प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर्स विजापूरवरून महामार्गाने मुंबईकडे निघाले होते. पुणे - सोलापूर महामार्गावर तोंडेवस्तीनजीक गाडी आल्यानंतर चालकास डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले. 

Web Title: Two doctors dead in motor car crash