त्या दोघी शेळ्या चारायला गेल्या अन् तळ्यात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

वडगाव निंबाळकर : शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या दोन मुलींचा तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना लोणी भापकर (ता. बारामती) येथे शनिवारी (ता. 18) सायंकाळी घडली. 

‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून लूट

तन्वी रोहिदास होळकर (वय 12) आणि समीक्षा युवराज भोसले (वय 12) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत रोहिदास विश्वास होळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यास खबर दिली.

पुण्यातील 'या' परिसरातील पाण्याचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेलेच

तन्वी आणि समीक्षा शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर शिंदेमळा येथील राहत्या घरी आल्या. दुपारनंतर त्या शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या. सायंकाळी नेहमीप्रमाणे शेळ्या घरी आल्या. पण, तन्वी आणि समीक्षा आल्या नाहीत. यामुळे घरातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. जवळच असलेल्या तळ्याजवळ मुलींच्या चपला आढळून आल्या. त्यांनी तळ्यातील पाण्यात शोधाशोध केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. 

सामान्यांकडून दंड वसूल; पोलिसांच्या वाहनांकडे मात्र दुर्लक्ष

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls drowned in lake at loni pune

टॅग्स