कसबा पेठेत तोडफोड; परस्परविरोधी फिर्याद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - पूर्ववैमनस्यातून सोमवारी सायंकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका गटाने कसबा पेठेतील गॅरेजसमोर लावलेल्या रिक्षा व मोटारींच्या काचा फोडल्या. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. 

कसबा पेठेतील कुंभार वेस परिसरात सोमवारी सायंकाळी श्री ऑटो वर्क्‍स गॅरेजसमोर लावलेल्या रिक्षा व मोटारी फोडण्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीर लियाकतअली मंजर अली (वय 60, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अली यांचे हे गॅरेज आहे. त्यांचा नातेवाईक बबलू सय्यद याने सैफ सय्यद यास मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरुन सय्यद व त्याच्या सात साथीदारांनी तलवारी व लोखंडी गजाने गॅरेजसमोर लावलेल्या रिक्षा व मोटारीच्या काचा फोडल्या. तसेच गॅरेजवर दगडफेक करून 19 हजार रुपयांचे नुकसान केले. 

दरम्यान, सैफ सय्यद (वय 21, रा. कोंढवा बुद्रुक) यानेही फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामगार इरफान शेख याच्याशी झालेल्या भांडणातून सय्यद व त्याचा भाऊ तौसिफ यांनी इरफानला मारहाण केली होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता सय्यद हा त्याच्या जुन्या घराजवळ पाणी पिण्यासाठी गेला. त्या वेळी दोघांनी त्यास जबर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

Web Title: Two group fights in Kasba Peth