दौंड : पोलिस ठाण्याच्या आत दोन गटात हाणामारी, पाच अटकेत

Two groups clash inside police station in Daund five arrested
Two groups clash inside police station in Daund five arrested

दौंड (पुणे) : दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परस्परांना लाथाबुक्क्यांनी तुडवत जोरदार हाणामारी करणार्यांना पोलिसांनी मात्र बदडून काढले आहे. 

२० सप्टेंबर रोजी शहरातील दौंड - कुरकुंभ रस्त्यावर सरवदे व सय्यद यांच्यामध्ये अज्ञात कारणावरून वादावादी होऊन हाणामारी झाली होती. त्यानंतर सदर प्रकाराची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट काल रात्री साडेनऊ वाजता दौंड पोलिस ठाण्यात जमावासह आले होते. दोन्ही गटातील युवक व तरूण पोलिस ठाण्याच्या आत व बाहेर जमाव करून उभे होते. दरम्यान रात्री सव्वादहा वाजण्याच्या दरम्यान ध्वजस्तंभासमोर दोन्ही गटात अर्वाच्च भाषेत शिवीगाळ होऊन परस्परांना लाथाबुक्क्यांनी तुडवत जोरदार हाणामारी झाली.

पोलिस ठाण्यात अचानक सुरू झालेल्या प्रकारामुळे सुरवातीला पोलिसांची धावपळ झाली परंतु त्यांनी दोन्ही गटांना पोलिसी खाक्या दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी बुध्दभूषण अनिल सरवदे (वय २४) , स्वप्नील सदानंद गायकवाड (वय २१, दोघे रा. पद्मावतीनगर, लिंगाळी, ता. दौंड), सुभाष सर्जेराव सरवदे (वय २१ , रा. वेताळनगर, लिंगाळी), मोहमंद नजीर सय्यद (वय २२) व अश्पाक अन्सार सय्यद (वय २४, दोघे रा. पंचशील टॅाकीज मागे, दौंड) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मारामारीत बुध्दभूषण सरवदे व अश्पाक सय्यद जखमी झाले आहेत. 

पोलिस नाईक आसिफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरूध्द बेकायदा जमाव करणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ऋषीकेश अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

जमावाला बदडले...

दौंड पोलिस ठाण्याच्या आत दोन्हीकडील जमावाकडून जोरदार हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांनी तत्काळ पोलिस ठाण्याचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार लावून घेत मारामारी करणार्यांना चांगले बदडून काढले. प्रवेशद्वारच लावल्याने हाणामारी करणार्यांना बाहेर पळता आले नाही व ही कारवाई बघून पोलिस ठाण्याच्या बाहेर जमलेला जमाव मात्र पळून गेला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com