भाजपवासी हर्षवर्धन पाटलांमुळे जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 November 2019

राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पुणे जिल्हा कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. परिणामी, इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक आदींनी पाटील यांच्यासमवेत भाजपत अधिकृत प्रवेश केला नसला तरी, या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांचाच प्रचार केल्याची चर्चा जिल्हा कॉंग्रेसमध्ये रंगू लागली आहे.

पुणे : राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पुणे जिल्हा कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. परिणामी, इंदापूर तालुक्‍यातील कॉंग्रेसचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक आदींनी पाटील यांच्यासमवेत भाजपत अधिकृत प्रवेश केला नसला तरी, या सर्वांनी विधानसभा निवडणुकीत पाटील यांचाच प्रचार केल्याची चर्चा जिल्हा कॉंग्रेसमध्ये रंगू लागली आहे. परिणामी इंदापूर तालुक्‍यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी हे आता केवळ तांत्रिकदृष्ट्या कॉंग्रेसमध्ये उरले आहेत. सध्या या सर्वांची स्थिती मनाने भाजप आणि देहाने कॉंग्रेसमध्ये असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

यामध्ये इंदापूर तालुक्‍यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इंदापूर नगर पालिकेवर कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामुळे इंदापूर नगरपालिका आणि पंचायत समितीत कॉंग्रेसचे बहुमत असले तरी या दोन्ही संस्था हर्षवर्धन पाटील गटाच्या ताब्यात जाणार आहेत. या दोन्ही केवळ कागदोपत्री कॉंग्रेसच्या ताब्यात असणार आहेत. कारण, या संस्थांवरील कॉंग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी हे हर्षवर्धन पाटील समर्थक असून, ते आजही त्यांच्यासोबत आहेत. मात्र त्यांनी अद्यापही भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नसल्याचे जिल्हा कॉंग्रेसकडून
सांगण्यात आले आहे.

आळंदी यात्रेसाठी पीएमपीचे 211 बसचे नियोजन 

इंदापूर तालुक्‍यातील सातपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य कॉंग्रेसचे आहेत. पंचायत समितीत 14 पैकी 9 सदस्य आणि इंदापूर नगरपालिकेतील 17 पैकी 9 नगरसेवक हे कॉंग्रेसचे आहेत. शिवाय नगराध्यक्षा अंकिता शहा याही कॉंग्रेसच्या आहेत. याशिवाय कर्मयोगी शंकरराव पाटील आणि नीरा भीमा हे दोन कारखाने पाटील यांच्याकडे आहेत.

जेव्हा शरद पवार कोण नवनीत राणा असा प्रश्न करतात?

झेडपीत तीन विरुद्ध चार सदस्य
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे येथे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अन्य कोणत्याही पक्षाच्या मदतीची गरज भासणार नाही. याउलट जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे केवळ सात सदस्य आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्‍यातील तीन, भोर व पुरंदरमधील प्रत्येकी एक आणि वेल्हे तालुक्‍यातील दोन सदस्यांचा समावेश आहे. यापैकी इंदापुरातील तीन सदस्य हर्षवर्धन पाटील समर्थक आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कॉंग्रेस सदस्यांमध्ये पाटील समर्थक तीन विरुद्ध चार असे दोन गट निर्माण झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two groups in Pune district Congress due to Harshavardhan Patil enters in BJP