कुरकुंभ (पुणे) : मळद (ता. दौंड) येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून खासगी आराम बसची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ट्रकमधील लोखंडी रॉड बसमध्ये घुसल्याने दोन जण जखमी झाले. अपघात बसचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मळद येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ गुरुवारी (ता. 5) महामार्गावरून पुण्याकडून सोलापूरकडे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला (क्र. के.ए.56, 0965) भरधाव जाणाऱ्या खासगी आराम बसची (क्र. एम.एच. 2, एफ.सी. 3255) पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात ट्रकमधील लोखंडी रॉड पुढील बाजूने बसमध्ये घुसल्याने दोन जण जखमी झाले. अपघात एवढा मोठा होता की, लोखंडी रॉडमुळे बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाही. या जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.