माजी एनएसजी कमांडोकडून दोन किलो सोने जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - बांधकाम व्यावसायिकाकडून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या एनएसजीच्या माजी कमांडोसह तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन किलो सोने आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले आणि वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी शुक्रवारी दिली. 

कमांडो नवनाथ बाजीराव मोहिते (वय 31), त्याचा भाऊ रघुनाथ मोहिते (वय 29) आणि किसन चव्हाण (वय 40, सर्व जण रा. नेवासा, जि. नगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक कल्पेश ओसवाल (वय 34, रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली होती. 

आरोपी नवनाथ मोहिते हा सैन्य दलात शिपाई म्हणून नोकरीस होता. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून नोकरीस होता. नोकरी सोडल्यानंतर तो भावासह पुण्यात आला. फिर्यादी ओसवाल यांच्याकडे उप कंत्राटदार म्हणून काम करीत होता. ओसवाल यांनी त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि दोन किलो सातशे ग्रॅम सोने सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. काही दिवसांनंतर त्यांनी सोने आणि कागदपत्रे परत मागितले; परंतु आरोपींनी कागदपत्रे आणि सोने परत हवे असल्यास 25 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तसेच, पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे ओसवाल यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहायक निरीक्षक सुनील गवळी, कर्मचारी संदीप दळवी, नीलेश देसाई, मंगेश पवार, धीरज भोर, कांता बनसुडे, किरण चोरगे, फिरोज पठाण, बबन बोऱ्हाडे, व्ही. डी. पवार, रमेश गरूड यांच्या पथकाने आरोपींना नगर जिल्ह्यातून अटक केली. मोहिते हा एनएसजी कमांडो असल्यामुळे त्याला अटक करताना त्याने विरोध केला. त्या वेळी पोलिस आणि कमांडोमध्ये झालेल्या झटापटीत पोलिसांनी मोहिते याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याने घरी आणि नातेवाइकांच्या घरी सोने ठेवले होते. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक किलो 818 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि वीट, कागदपत्रे आणि पिस्तूल जप्त केले.

Web Title: Two kg gold seized from the former NSG commando