पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातात रेल्वे पोलिसासह दोनजण ठार 

accident.
accident.

लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर व सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात, रेल्वे पोलिसासह दोन जण झाले आहे. 

रेल्वे पोलिस अंकुश रामदास माने (वय 35, रा. रेल्वे कॉलनी, कदमवाकवस्ती ता. हवेली) हे जागीच ठार झाले. दुसऱ्या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. दोन्ही अपघात सोमवारी (ता. 9) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झाले. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश माने हे सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशनहून माळीमळ्याकडे जात असताना पुणे बाजूकडून आलेल्या भरधाव ट्रकने माने यांच्या मोटार सायकलला लोणी कॉर्नर जवळच्या पुलावर पाठीमागून जोरदार धडक दिली. यात माने यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने माने यांचा जागीच मृत्यू झाला. माने हे सध्या रेल्वे पोलिसांच्या पुणे येथील कार्यालयात कार्यरत होते. 

दुसऱ्या एका घटनेत सोरतापवाडी हद्दीतील बालाजी वटन काट्याजवळ अज्ञात वाहनाने एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीला उडविले. जखमी अवस्थेत पडलेल्या या व्य्क्तीला लोणी काळभोर पोलिसांनी उपचारासाठी लोणीस्टेशन येथील एका रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच संबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. तपास पोलिस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com