पुणे : कात्रज घाटाजवळ अपघात, दोन ठार 

पुणे : कात्रज घाटाजवळ अपघात, दोन ठार 

पुणे : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. तर अन्य दोघेजण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर शनिवारी रात्री आठ वाजता घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण नारायण पवार (वय 30, रा.जांभुळवाडी रोड, दत्तनगर, कात्रज) व किशोर विष्णु पांचाळ (वय 18, रा. लाटणे चाळ, कात्रज) अशी अपघातात मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रोहित पांडुरंग साळुंखे (वय 18, रा. अंजनीनगर, कात्रज) व छबुताई नारायण पवार (वय 55, रा.जांभुळवाडी) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण व छबुताई हे दोघेजण कात्रजकडून भोरच्या दिशेने त्यांच्या दुचाकीवरुन होते. त्याच वेळी रोहीत व किशोर हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरुन कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे येत होते. दोघाच्याही गाड्या महामार्गावरील स्वागत हॉटेल येथे समोरासमोर आल्याने त्यांच्यात जोरदार धडक बसली. त्यावेळी रोहित साळुंखे याच्या डोक्याला व अंगावर मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या. तर दुचाकीवर मागे बसलेल्या छबुताई यांनाही जोरदार मार लागून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी किशोर याला देखील गंभीर दुखापत झाली.  प्रवीण पवार व  किशोर पांचाळ हे देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यासह चौघानाही उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले. प्रवीण व किशोर यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. छबुताई यांच्यावर भोर येथील रूग्णालयात तर, रोहित याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com