वारजे माळवाडी परिसरात दोन अपघातात दोन ठार 

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 12 जून 2018

वारजे माळवाडी : येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाल्याच्या घटना रविवारी रात्री घडल्या आहेत. हे दोघे ही वारजे परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

पहिला अपघात रात्री दहा वाजता स्पंदन बिल्डिंग समोर झाला. एक दुचाकीवरून तिघेजण जात असताना गटारात दुचाकी गेली. यातील एक जण ठार झाला आहे. दोघेजण जखमी आहेत. 

दुसरा अपघात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अतुलनगर परिसरातील विनायक हॉस्पिटल समोर हा अपघात घडला. यात दुचाकी चालक गाडी बाजूला लावून जात असताना एका ट्रक चालकाने त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिली. हे दोन्ही अपघात 150 ते 200 मीटर परिसरात घडले आहेत.

Web Title: Two killed in two road accidents in Malegaon area of ​​Warje