चारशे रुपयांसाठी दोघांचा खून

Murder
Murder

पिंपरी - अवघ्या चारशे रुपयांच्या वादातून मित्रांनीच आपल्या मित्राचा खून केला. या खुनाला विरोध करणाऱ्या त्यांच्या साक्षीदार मैत्रिणीलाही संपविले. निगडी पोलिसांनी या दुहेरी खूनप्रकरणी तिघांना अटक केली असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली ऊर्फ मॅक्‍स वाकडे (वय ३३, रा. ओटास्कीम निगडी) आणि सलमान शब्बीर शेख (वय २०, रा. देहूरोड) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. रवी मानसिंग वाल्मीकी (वय ३२, रा. देहूरोड), नागेश शिलामन चव्हाण (वय २३, रा. आकुर्डी), विशाल महिंद्र वाल्मीकी (वय २५, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, सचिन रोहिदास चव्हाण (वय २३, रा. रुपीनगर, तळवडे) आणि प्रशांत शशिकांत साळवी (वय २५, रा. देहूरोड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

रविवारी (ता. २२) सोनालीचा मृतदेह केजूदेवी बंधाऱ्यात मिळाला. सोनालीच्या भावाने तो मृतदेह सोनालीचा असल्याचे सांगत याबाबत घातपाताची शक्‍यता व्यक्‍त केली. निगडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी फारुख मुल्ला यांना आरोपींचा ठावठिकाणा मिळाला. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी खाक्‍या दाखविताच खुनाचे खरे कारण समोर आले. सलमान याचा मित्र अमीर याला रवीने पाचशे रुपये उसने दिले होते. या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्या वेळी त्यातील १०० रुपये परत दिले. या भांडणात सलमानने अमीरची बाजू घेत रवीला मारहाण केली. यामुळे रवीच्या डोक्‍यात सलमानविषयी प्रचंड राग होता. १९ जुलै रोजी रवीने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे भांडवल करीत सर्वांना पार्टीसाठी बोलविले. ते सर्व पार्टीसाठी सांगवडे येथे गेले. दारू पिल्यानंतर रवी आणि सलमान यांच्यात पुन्हा वाद झाला. रवीने इतर आरोपींच्या मदतीने सलमानचा गळा आवळून खून करीत मृतदेह झुडपात टाकला. 

मित्राच्या खुनाला विरोध करणाऱ्या सोनालीचाही गळा दाबून तिचा मृतदेह पाण्यात टाकून दिला. सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनवणे, कर्मचारी तात्या तापकीर, मंगेश गायकवाड, राम साबळे, फारुख मुल्ला, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, शरीफ मुलाणी, आनंद चव्हाण, स्वामिनाथ जाधव यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com