जमिनीच्या नोंदणीकरीता लाच घेणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

लोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १२) रंगे हाथ पकडले. हि कारवाई बुधवारी (ता. १२) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील मंडळ कार्यालयात केली. 

याप्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर जगन्नाथ दगडे (वय-५०, रा. पूर्वा नगरी, हडपसर), व अशोक तात्याबा वाघमारे (वय-३४, रा. उरुळी कांचन) या दोघांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, वरील दोघांनाही अटक केले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी दिली.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एक शेतकरी व त्याच्या पत्नीच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी अशोक वाघमारे याने मंडळ अधिकारी चंद्रशेखर दगडे यांचे नाव सांगून, संबंधित शेतकऱ्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आल्याने, त्यांनी कारवाई केली. व दोघांनाही लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले.हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक वर्षा पाटील, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर व घनशाम बळप यांनी केली.

Web Title: two officers arrested while taking bribe for land registration