महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दोन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ६) अटक केली.
Bribe News
Bribe NewsSakal
Summary

लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ६) अटक केली.

पुणे - अंगणवाडीच्या कामाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ६) अटक केली. प्राधिकरणाच्या लष्कर परिसरातील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

किरण अरुण शेटे (वय ३१) व परमेश्वर बाबा हेळकर (वय ४९) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. शेटे हा उप अभियंता (यांत्रिकी) या पदावर कार्यरत असून खेळकर हा शाखा अभियंतां आहे. शिवेगाव येथील अंगणवाडीत इलेक्ट्रिक कामे तसेच पाणी शुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरीफायर) बसवण्याच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी या दोघांनी एका ठेकेदाराकडे लाच मागितली होती. पहिल्या टप्प्यात त्यांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये मागितले होते. त्या संदर्भात, या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधनक विभागाकडे तक्रार दिली होतो. त्याबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने पडताळणी केली. त्यांनतर पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे व उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात सापळा रचून दोघांना पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com