मेट्रोच्या खोदकामावेळी सापडली दोन जुनी भुयारे (व्हिडिओ)

मेट्रोच्या खोदकामावेळी सापडली दोन जुनी भुयारे (व्हिडिओ)

पुणे - भुयारी मेट्रोसाठी स्वारगेट चौकाजवळ खोदाई सुरू असताना महामेट्रोला दोन जुनी भुयारे सापडली. त्यांची लांबी सुमारे ५७ मीटर असून, उंची सुमारे सात फूट आहे. या भुयाराचा कालावधी कधीचा आहे हे अद्याप निश्‍चित  झालेला नाही.

पिंपरी-स्वारगेट मार्गावर मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालय ते स्वारगेटदरम्यान मेट्रो मार्ग भुयारी आहे. त्यासाठी स्वारगेट चौकातून नियोजित ट्रान्स्पोर्ट हबजवळ खोदाई सुरू आहे. त्यात दोन दिवसांपूर्वी ही भुयारे सापडली आहेत. त्यातील राडारोडा काढण्यात आला आहे. बाजूला मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हब आणि भुयारी मेट्रोचे काम सुरूच राहणार  असल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. 

लांबी ५७ मीटर
सापडलेल्या भुयारांची लांबी ५७ मीटर आहे. उंची सुमारे सात फूट असून, दोन ते अडीच फूट रुंदी आहे. भुयारांची एक बाजू पर्वतीच्या दिशेने, तर दुसरी एसटी स्थानकाच्या दिशेला आहे. जमिनीपासून सुमारे २० ते २५ फूट खाली आहे. 

महामेट्रोने महापालिकेला या भुयारांबाबत कळविले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणीही केली आहे. नजीकच्या मुठा उजव्या कालव्यातून पाणी उचलून येथील पूर्वीच्या जलकेंद्रात आणि जलतरण तलावात आणण्यासाठी हे भुयार खोदण्यात आले असावे, असाही एक अंदाज व्यक्त होत आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे. 
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

पुण्यात १० जुलै १९४५ रोजी कालवा फुटला होता, तेव्हा सुमारे ५ लाख लोकसंख्या होती. त्या वेळी पुण्यात पाण्याची टंचाई झाली होती. त्यामुळे तत्कालीन नगर परिषदेने कात्रज तलावातून पाणी आणून शहराच्या विविध भागांत पोचविले होते. ही भुयारे त्या व्यवस्थेचा एक भाग असावा. त्यात दगडी नळही आहेत. जुन्या पुण्याला पाणी पुरविण्यासाठी या भुयारांचा वापर झाला असावा.
- मंदार लवाटे , इतिहास संशोधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com