जुना सातबारा उतारा देण्यासाठी एक हजारांची लाच घेतली अन्...

Two Operator Arrested for taking bribe of Rs 1000 in Pune
Two Operator Arrested for taking bribe of Rs 1000 in Pune

पुणे : जुने सात-बारा उतारा देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या वडगाव शेरी तलाठी कार्यालयातील महिला संगणक ऑपरेटरसह निवृत्त कोतवालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई सोमवारी तलाठी कार्यालयामध्ये करण्यात आली. 

पुनम विष्णू जानवळे (वय 30, रा. वडगावशेरी) आणि विकास शंकर जोशी (वय 60 ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जानवळे या वडगाव शेरी तलाठी कार्यालयामध्ये संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. तर जोशी सेवानिवृत्त कोतवाल आहे. कोतवाल सध्या तलाठी कार्यालयामध्ये मदतनीस म्हणून काम करीत आहे. दरम्यान, तक्रारदार यांना त्यांच्या वैयक्तीक कामासाठी जुना सात-बारा पाहीजे होता. त्यासाठी ते काही दिवसांपासून संबंधीत कार्यालयामध्ये जात आहेत. जोशी याने तक्रारदारास जुना सात बारा उतारा मिळवून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली.

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात होणार भारतातील गरीबी दूर

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जानवळे हिस लाच स्विकारताना अटक केली. त्याचवेळी जोशी यालाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध लाचललुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com