esakal | बारामतीत वाढली कोरोनाची साखळी...एकाच दिवशी...
sakal

बोलून बातमी शोधा

corona

बारामती शहरात लॉकडाउन संपल्यानंतर लोकांनी केलेली प्रचंड गर्दी आता प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनत असून, अनेक जण बिनधास्त मास्कविना सगळीकडे फिरत आहेत. 

बारामतीत वाढली कोरोनाची साखळी...एकाच दिवशी...

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) :  बारामती येथील आयटी अभियंत्यांच्या भावासह तालुक्यातील लोणी भापकर येथील एकास कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. आज एकाच दिवशी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

पुण्यामध्ये आजपासून नवीन नियम लागू...

बारामती शहरातील 29 वर्षीय युवक हा संबंधित कोरोनाग्रस्त आयटी अभियंत्यांच्या संपर्कात आलेला होता.  त्यामुळे त्याची तपासणी केली गेली. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान, तालुक्यातील लोणी भापकर येथे लोणावळ्यावरून परतलेल्या पोलिसासही कोरोनाची बाधा झाली आहे. संबंधित पोलिसाच्या खोलीमध्ये राहणारा दुसरा पोलिस कोरोनाग्रस्त असल्याचे समजले. त्यानंतर या पोलिसाच्या घशातील द्रावाचे नमुने तपासल्यानंतर त्यालाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या पोलिसाने लोणावळ्यावरून परतल्यानंतर आरोग्य यंत्रणेस तशी कल्पना दिलेली नव्हती. 

कोरोनामुळे 78 टक्के लघू, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

बारामती शहरात लॉकडाउन संपल्यानंतर लोकांनी केलेली प्रचंड गर्दी आता प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनत असून, अनेक जण बिनधास्त मास्कविना सगळीकडे फिरत आहेत. बँकासह अनेक ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात का, असा विचार सुरु झाला आहे. 

जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे...

बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येकाची माहिती आरोग्ययंत्रणेस देणे गरजेचे आहे. अनावश्यक प्रवास टाळण्यासह गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये, मास्कचा वापर केलाच पाहिजे, या शिवाय वयोवृध्द नागरिक, लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आलेले आहे.  मात्र, होणा-या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढेल की काय, अशी भीती आता सतावू लागली आहे.