कोरेगावात मोटारीच्या धडकेत दोन पादचारी ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कोरेगाव भीमा  : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमानदीवरील पुलाच्या वळणावर काल रात्री मोटारीच्या धडकेत दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी बॅरीगेडला धडकून खडड्यात गेल्याने मोटारीचाही चक्काचूर झाला.

कोरेगाव भीमा  : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे भीमानदीवरील पुलाच्या वळणावर काल रात्री मोटारीच्या धडकेत दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर, महामार्गालगतच्या संरक्षक लोखंडी बॅरीगेडला धडकून खडड्यात गेल्याने मोटारीचाही चक्काचूर झाला.

मृतांमध्ये संतोष मनु माने (वय ३८) व राजेंद्र काकुराम जाधव (वय ४२, दोन्ही रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांचा समावश आहे. या प्रकरणी आशा संतोष माने यांच्या फिर्यादीनुसार शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल रात्री दहाच्या सुमारास 
कोरेगाव भीमा गावच्या हद्दीत भीमानदीवरील पुलाच्या वळणावर पुण्याकडून शिरूरकडे जाताना मोटार(क्रं. एम. ए.१२ क्यु. एन. ५०५५) या मोटार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पायी जाणाऱ्या दोघांना मोटारीची जोरात धडक बसली. त्यानंतर ही मोटार महामार्गालगतचे लोखंडी संरक्षण बॅरीगेड तोडून रस्त्याखाली खोल झाडीत कोसळली.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटारीतील युवकांना बाहेर काढले. परंतु रात्रीच्या अंधारात मोटारीच्या धडकेने जखमी होवून झाडीत पडलेले दोघे अपघातग्रस्त मात्र स्थानिकांच्या वेळीच निदर्शनास आले नाहीत. मात्र, दारुच्या नशेत मोटार चालवणाऱ्या युवकांनीही त्याबाबत त्वरित सांगितले नसल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. 
    
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत माने व जाधव हे दोघेही घरी न आल्याने कुंटूबाने शोध घेतल्यानंतर या दोघा जखमींना झाडीतून बाहेर काढण्यात आले. मात्र  तोपर्य्ंत त्या  दोन्ही जखमींचा मृत्यु झाला होता. अपघातानंतर अपघात स्थळावरुन फरार झालेल्या अज्ञात मोटार चालकाविरोधात शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून पोलीस मोटारीतील तरुणांचा शोध घेत आहेत. हमाली काम करणारे संतोष माने व त्यांच्या मामाचा मुलगा राजेंद्र जाधव हे दोघेही कोरेगावातील घरी पायी परत येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांना वेळेत उपचार मिळाले असते तर, कदाचित त्यांचे प्राण वाचु शकले असते.

या वळणावर वाहनांचा वेग प्रचंड असल्याने यापूर्वीही बॅरीगेड तोडून अनेक अपघात झाले असून रस्त्यालगत खोल झाडी असल्याने अपघातग्रस्त वाहन लवकर लक्षात येत नाही. या ठिकाणी पथदिवे व बॅरीगेड दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.
 

Web Title: Two Pedestrian killed in a car crash in Koregaon