उरुळी कांचनमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

loni-kalbhor
loni-kalbhor

लोणी काळभोर - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पंधरा वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्युचे गुढ पाच दिवसानंतरही कायम असले तरी, संबधित मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन स्थानिक युवकांना मात्र लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी (ता. 24) दुपारी अटक केली आहे. प्रशांत निवृत्ती शेळके (वय- 22 वर्षे) व प्रविण विलास गाढवे (वय- 23 वर्षे, रा. दोघेही, उरुळी कांचन (बगाडेवस्ती) ता. हवेली) ही त्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांवरही बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार (पास्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. 

उरुळी कांचन येथील एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यदेह तिच्या राहत्या घरातील बाथरुममध्ये शनिवारी (ता. 20) पहाटे आढळून आला होता. त्यातच संबधित मुलगी पाच महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्याने उरुळी कांचन व परीसरात मुलीच्या मृत्युबाबत शाशंकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संबधित मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार व तिच्या मृत्युबाबत कसलाही पुरावा नसताना, लोणी काळभोर पोलिसांनी मात्र मोठे कौशल्य़ वापरत वरील वरील दोन आरोपीना अटक करण्यात यश मिळवले आहे. प्रशांत शेळके व प्रविण गाढवे या दोघांनीही संबधित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली असुन, या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांना पंधरा हजार रुपयांचे इनाम पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी जाहीर केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील पंधरा वर्षीय शाळकरी मुलगी तिच्या रहात्या घरातील बाथरुममध्ये शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मृताअवस्थेत आढळुन आली होती. मॄतदेहावर कसल्याही खुना नसल्याने संबंधित मुलीचा खुन की आत्महत्या याबाबत नेमके सांगत येत नसल्याने, शवविच्छेदन करण्याऱ्या वैधकिय अधिकाऱ्यांनी संबधित मुलीचा व्हिसेरा राखुन ठेवला होता. संबधित मुलगी पाच महिण्याची गरोदर असल्याने, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबधित मुलीचे नातेवाईक व संबधित मुलगी रहात असलेल्या परीसरात लक्ष केंद्रित केले होते. यात प्रशांत शेळके व प्रविण गाढवे या दोघांचे मागिल कांही महिण्यापासुन संबधित मुलीबरोबर संबध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी (ता. 23) रात्री वरील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. यात वरील दोघांनीही संबधित मुलीबरोबर शारीरीक संबध असल्याची कबुली दिली. यावरुन पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार (पास्को) अंतर्गत प्रशांत शेळके व प्रविण गाढवे या दोघांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करुन, अटकही केली.

रक्ताचे प्रमाण कमी असल्याने मृत्यु
दरम्यान मुलीच्या मृत्युचे गुढ पाच दिवसानंतरही कायम असले तरी, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मुलीच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व अशा अवस्थेत ती गरोदर राहिल्याने तिचा मृत्यु झाल्याचे पुढे आले आहे. एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संधित मुलीची तब्बेत अतिशय नाजुक झाली होती. ती गरोदर असतानाच, तिच्या शरीरात रक्तही अंत्यत कमी झाले होते. शवविच्छेदन करणाऱ्या वैधकिय अधिकाऱ्यांनी मुलीवर विष प्रयोग झाल्याचे नाकारले आहे तर दुसरीकडे मॄतदेहावर कसल्याही खुना नव्हत्या. अल्पवयीन वयात मातृत्व व त्यात शरीरीत रक्ताचे प्रमाण कमी यामुळे मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या वैधकिय अधिकाऱ्यांनी खाजगीत मान्य केले आहे. मात्र व्हिसेराचा अंतीम अहवाल आल्याशिवाय मृत्युचे नेमके कारण स्पष्ठ होणार नाही असेही संबधित अधिकाऱ्याने स्पष्ठ केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com