Bus Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार, 15 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bus Accident

Bus Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार, 15 जखमी

केडगाव : पुणे सोलापूर महामार्गावर चौफुला तालुका दौंड जवळ आराम बस रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दोन जण जागीच ठार तर 15 जखमी झाले आहेत. जखमी मधील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमींना चौफुला व पुणे येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. बस मध्ये 35 प्रवासी प्रवास करीत होते. बस सोलापूरकडून पुण्याला जात होती. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जखमींना यवत पोलीस, महामार्ग पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णालयात हलवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पावणे पाचच्या सुमारास सोलापूरकडून एक ट्रॅव्हल्सन पुण्याच्या दिशेला जात होती. दरम्यान या मार्गावर एका ट्रकचा टायर फुटला असल्याने तो एका बाजूला उभा केला होता. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून धडक दिली. ट्रॅव्हल्स ३५ लोक होते. या घटनेत १५ जण जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :accidentbus accident