बारामती: गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोन जण ताब्यात

मिलिंद संगई
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

बारामती - जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन ठिकाणी कारवाई करुन दोन जणांना बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतले. 

यातील पहिली कारवाई बारामतीतील सातव चौकात झाली. विकास उर्फ विकी बापूराव पवार (वय 25, रा. तांदुळवाडी ता.बारामती जि.पुणे) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल व एक रिकामे काडतूस जप्त करण्यात आले. 

दरम्यान, दुस-या कारवाईत अभिजित जगन्नाथ काळे (वय 21, दांगटनगर, शिवणे, ता. हवेली, जि. पुणे) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडूनही एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. या पैकी विकी पवार याला बारामती शहर तर अभिजीत काळे यास पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.     

एलसीबी शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक गणेश क्षीरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, धिरज जाधव, रवि कोकरे, आनिल काळे यांनी ही कारवाई केली. विकास पवार हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी दरोडा, मारामारी व आर्म अॅक्ट प्रमाणे एकूण 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो सध्या बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या मारामारीच्या गुन्हयात फरारी होता. 

Web Title: Two people were arrested for keeping pistol