बारामती-मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागजला आपघातात दोन ठार

 Two people were killed in a road accident
Two people were killed in a road accident

उंडवडी (बारामती) - मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागज गावाच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या आपघातात दोन जागीच ठार झाले. हा आपघात आज  सकाळी (ता.16) सोमवारी रोजी दहाच्या दरम्यान घडला.

पोलिसांकडून मिळालेली अशी, हुंडाई कंपनीची चारचाकी - वेराणा (क्रमांक एम. एच 42 के - 9446) या गाडीत सुनील हेमराज बोत्रा (वय-51) रा. रुई एम. आय.डी.सी. बारामती हे त्यांची पत्नी व दोन मुलांसमवेत पुण्याहून मोरगाव मार्गे बारामतीकडे चालले होते. तर दुचाकी (क्रमांक एम.एच. 42 ए.एल. 7860) बुलेटवर आरबाज आरीफ बागवान (वय-21)  रा. सुपे (ता. बारामती) हे एकटेच बारामतीकडून मोरगावकडे निघाले होते. 

कऱ्हावागज गावाच्या हद्दीत जानाई पेट्रोलपंपाजवळ आल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी यांचा समोरासमोर जोरदार धडक झाली. याआपघातात  दुचाकी लांबवर फेकली गेली. हा आपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील आरबाज बागवान व चारचाकीमधील चालक सुनील बोत्रा हे गंभीर झाल्याने जागीच मरण पावले.  

मयत सुनील बोत्रा यांची पत्नी व दोन मुले हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com