कोळेगावात एकाच्या मृत्यूप्रकरणी दोघे चौकशीसाठी ताब्यात

राजकुमार शहा
बुधवार, 25 एप्रिल 2018

कोळेगाव ता. मोहोळ येथील संजय तुळजीराम मल्लाव (38) यांच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी सुरेखा मल्ला व हिनाने आपल्या पतीचा अकस्मात मृत्यू नसून त्यांचा खून झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसांत दिली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मोहोळ : कोळेगाव ता. मोहोळ येथील संजय तुळजीराम मल्लाव (38) यांच्या मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी सुरेखा मल्ला व हिनाने आपल्या पतीचा अकस्मात मृत्यू नसून त्यांचा खून झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसांत दिली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बालाजी उर्फ बाळु नाना भोई (20 ) रा. कोळेगाव व राजु भोई (22 ) रा. औराद अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत संजय यांचा लांबोटी शिवारात सकाळी आठ वाजता एका हॉटेल शेजारील पाण्याच्या डबक्यात पडून मृत्यू झाला होता. तर मृतदेहाशेजारी दारूच्या बाटल्या व मोबाईल सापडला होता. या घटनेची पोलिसांत अकस्मात मयत अशी नोंद झाली होती. दरम्यान, मृत संजय याची पत्नी सुरेखाने आपल्या पतीचा अकस्मात मृत्यू नसून त्यांचा खून झाल्याची फिर्याद आज मोहोळ पोलिसांत दिली आहे  

दरम्यान, बालाजी राजू व संजय यांची मद्यप्राशन करुन नेहमी शिवीगाळ होत होती शवविच्छेदन अहवालात संजय याचा मृत्यू गुदमरून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दतात्रय निकम करीत आहेत.

Web Title: two peoples have been arrested by police for Inquiry