बारामती व इंदापुरकरांच्या चिंतेत भर घालणारी बातमी

संतोष आटोळे
Sunday, 31 May 2020

- सिध्देश्वर निंबोडी येथील दोघांना कोरोनाची लागण

शिर्सुफळ : बारामती व इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सिध्देश्वर निंबोडी गावातील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामुळे बारामतीकर, इंदापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मूळचे सिध्देश्वर निंबोडी येथील असलेले व पुणे पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी (ता.17 मे) रोजी सुट्टी काढून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी सिध्देश्वर निंबोडी येथे आला होते. सोमवार (18 मे) मे रोजी पहाटे ते पुन्हा पुणे मुख्यालयात हजर झाले. मात्र, दोन तीन दिवसानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता सदर पोलिस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे शुक्रवार (ता.28 मे) रोजी त्यांच्या हाय रिक्स संपर्कात आलेल्या त्यांची आई, वडील, मुलगा व भावाचा लहान मुलगा यांना बारामती येथे विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज रविवार (ता.31) रोजी त्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये वडील (वय 65 वर्षे) व पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा (वय 14 वर्षे) यांचा अहवाल पाॅजेटिव्ह आला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिध्देश्वर निंबोडी हे गाव बारामती व  इंदापूर तालुक्याच्या सीमेवर आहे. यामुळे बारामतीसह भिगवण भागात ग्रामस्थांचा वावर असतो. तसेच या व्यक्तींनी भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहितीही समोर येत आहे. यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. द

दरम्यान, मुंबई, पुणे येथून रेडझोनमधून मोठ्या संख्येने नागरिक तालुक्यात येत असून, त्यामुळे तालुक्यात कोरोना येत आहे. त्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ज्या रेड झोनमधून नागरिक येतील, तेथून त्यांना कोरोना नसल्याचे तसेच आलेल्या सर्वांची कोविड 19 चाचणी झाल्याशिवाय त्यांना तालुक्यात प्रवेश देऊ नये, हा प्रवेश लपविणाऱ्या गावच्या संबंधित प्रशासकीय
जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी तरच कोरोनाचा प्रसार होणार नाही.अशी मागणी ग्रामस्थांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two peoples of siddheshwar nimbodi Corona Test Positive Baramati Indapur