Crime News : मोटार सायकल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील दोन जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two persons inter-district gang arrested case of motorcycle theft 47 motorcycles seized in month

Crime News : मोटार सायकल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील दोन जणांना अटक

नारायणगाव : पुणे ग्रामीण व नगर जिल्ह्यात मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन जणांना पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून २ लाख ४३ हजार रुपये किंमतीच्या एकुण आठ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.आशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

या प्रकरणी संदिप पोपट केदार( वय २१ ), राजु गंगाराम दुधवडे( वय २० , दोघेही राहणार चिखलठाण, राजबेट, ता. राहुरी)यांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,पोलीस हवालदार दिपक साबळे, पोलीस नाईक संदिप वारे,अक्षय नवले,दगडु विरकर यांनी केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील एक महिन्यात मोटार सायकल चोरीची तीसरी कारवाई केली आहे.या माध्यमातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन टोळयातील बारा आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून १५ लाख ९३ हजार रुपये किंमतीच्या एकुण ४७ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या मोटारसायकली नारायणगाव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोटारसायकली मालकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.मोटारसायकल चोरांचा छडा लावण्यात यश आल्याने मोटारसायकल चोरीचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

मोटारसायकलची चोरी केल्या नंतर आरोपी नंबर बदलून मोटारसायकलची कमी किमतीत विक्री करतात. चोरीची मोटार सायकल खरेदी करणे गुन्हा आहे. या मुळे जुनी मोटारसायकल खरेदी करताना काळजी घ्यावी. मोटारसायकल खरेदीची मूळ कागदपत्रे तपासून घ्यावीत. संशय आल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार दिपक साबळे यांनी केले आहे.

टॅग्स :Pune Newspunecrime