वडाचे झाड पडुन दोन जण जागीच ठार तर एक जखमी

सासवड वीर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील जोडप्याचा मृत्यू
पिंपळे ( ता. पुरदर ) येथील अर्धवट जळलेले वडाचे झाड अंगावर पडून दोघांचा मृत्यू
पिंपळे ( ता. पुरदर ) येथील अर्धवट जळलेले वडाचे झाड अंगावर पडून दोघांचा मृत्यूsakal

सासवड शहर : सासवड ( ता. पुरंदर ) वीर रस्त्यावर आज सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील जोडप्याचा मृत्यू झाला. तर एक सात वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी पुण्याला दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाउस व वादळ वारा सुरु झाला. यावेळी मयत रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९) व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय २३) त्याच बरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते. साधारण सात वाजणेच्या सुमारास पिंपळे ( ता. पुरदर ) येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले.

यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची भाची गंभीर जखमी झाली. या घटने नंतर परिसरातील नागरीक मदतीला धावले. पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्थांना ग्रामस्थांनी सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र तो पर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. तर मुलगी बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. रेनुकेश जाधव हा परींचे येथील पत्रकार गुणशेखर जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. तर रेनुकेश आणि सारिका यांचा चार महिन्या पूर्वीच विवाह झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com