फरार गुन्हेगाकडून दोन गावठी पिस्तुल, काडतुसे जप्त 

Crime.jpg
Crime.jpg

पिंपरी : भोसरी व नाशिक जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात चिंचवड पोलिसांना यश आले. हि कारवाई चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ गुरुवारी सापळा रचून करण्यात आली. चेतन रामलाल कुशवाह (वय 28, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव व कर्मचारी हे गस्तीवर असताना आरोपी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता, दोन गावठी पिस्तुल व तीन काडतुसे मिळून आले. त्याच्यावर एमआयडीसी सिन्नर दोन व भोसरी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्याला पिंपरी पोलिसांच्या तडीपार प्रस्तावानुसार दोन महिने पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे, निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव, हवालदार पांडुरंग जगताप, स्वप्नील शेलार, विजयकुमार आखाडे, राजेंद्र सिरसाठ, गोविंद डोके, पंकज भदाने, अमोल माने, वंदना गायकवाड यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com